Monday, 31 October 2022

वाचन प्रेरणा दिन

 डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला 

        सन २०२२/२३ या शैक्षिणिक वर्षात १५/१०/२०२२  रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय व्हाल मध्ये ठीक 10 वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रा.विश्वास पाटील यांनी केले .प्रमुख पाहुण्याचा परिचय गंथपाल के एम  कुंभार यांनी करून दिला. मार्गदर्शन करताना प्रो. डॉ  वसंत ढेरे म्हणले कि , “डॉ  ए पी जे अब्दुल कलाम हे लहान खेड्यातून भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत  पोहचलेले असामान्य व्यक्तिमत्व होते . भारताला आण्विक क्षमता आणि अंतराळ सामग्री निर्माण करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.”तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत आले.

            प्रा.डॉ. एन ए जरंडीकर ,प्रा.बी के पाटील ,प्रा.डॉ. कुलदीप पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. जे डी इंगवले  यांनी केले . तर आभार प्रा. आयेशा पटेल यांनी मानले .

          कार्यक्रमास प्रो.डॉ एकनाथ पाटील , प्रा. संग्रामसिह पाटील ,प्रा. सागर पार्टे , प्रा. पी ए मोकाशी ,

नरेंद नेवडे व शिक्षेकेत्तर कर्मचारी व 30 विद्यार्थी उपस्थित होते.

भित्तीपत्रके काही फोटो 











                Year -2023-24   वाचन प्रेरणा दिन 
   

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

ग्रंथालय विभाग

डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला

        सन २०२३/२४या शैक्षिणिक वर्षात १६/१०/२०२३  रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालयामध्ये ठीक १० वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा बी के  पाटील यांनी केले . मार्गदर्शन करताना प्रा  डॉ  एन ए जरंडीकर  म्हणले कि , “डॉ  ए पी जे अब्दुल कलाम याचा जन्म दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो .डॉ कलाम यांचे साहित्ये सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे असेच आहे.” तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महविद्यालयचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. वसंत ढेरे होते ते म्हणले, “डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती , वैज्ञानिक , महान लेखक होते .ते सतत म्हणत  एक चांगले पुस्तक शंभर मित्रा सारखे असते” .आपण या पासून वाचनाची प्रेरणा घेऊया . आभार  प्रा.प्रकाश कांबळे यांनी मानले तर  सूत्रसंचालन ग्रंथपाल श्री के एम कुंभार यांनी केले. प्रा.डॉ एकनाथ पाटील व ए एम कांबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

          कार्यक्रमास  प्रा. संग्रामसिह पाटील ,प्रा. सागर पार्टे , प्रा. पी ए मोकाशी , आयेशा पटेल प्रा. एस व्ही परीट नरेंद नेवडे, अनिल कांबळे , आर के पाटील  व शिक्षेकेत्तर कर्मचारी व 25 विद्यार्थी उपस्थित होते.




डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्र प्राचार्य डॉ व्ही डी ढेरे व वाचन प्रेरणा दिना विषयी मार्गदर्शन करताना प्रा बी के पाटील 



----------------------------------------------------------------------
15/10/2024

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

राधानगरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

 

राधानगरी महाविद्यालयातील एन.एस.एस.विभाग, सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभाग यांचेवतीने मंगळवार दि. 15/10/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा मजकूर वाचन व भारताचे पूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारताचे पूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन प्र. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील सर यांच्याहस्ते करणेत आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे डॉ. नितीन जरंडीकर हे लाभले होते, त्यांनी राधानगरी भागात देखील लेखक आहेत, त्यांचे लेखन वाचायला हवे म्हणजे लुप्त होत चाललेले ग्रामीण शब्द ,भाषा याची नव्या पिढीला माहिती मिळेल, असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे  अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील सर  यांनी  वाचन एक कला आणि अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर साहित्याचे देखील वाचन केले पाहिजे. असे विचार मांडले. तसेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम याचे काही विचार भीतीपत्रक च्या माध्यमातून सादर करणेत आले तसच काही मौलीख पुस्तकांचे सुद्धा प्रदर्शन करणेत आले.

कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एकनाथ पाटील यांनी केले,त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल , वाचन किती आवश्यक आहे याची माहिती दिली , व बी. . भाग 2 च्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन केले तर बी. कॉम.भाग दोन च्या विद्यार्थिनींनी भारताचे पूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची माहिती दिली.

वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभाग नोंदवला.या कार्यक्रमात प्रा.बी. के. पाटील, ग्रंथपाल के.एम. कुंभार, प्रा.. एम. कांबळे,  प्रा.सुनील सावंत, प्रा. धनश्री कनोजे, प्रा. आयेशा पटेल, प्रा.परीट प्रा. सागर पार्टे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. फयाज मोकाशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा गुरव यांनी केले तर आभार प्रा.स्नेहल डवर यांनी मानले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्ये भितपत्रक  प्रदर्शित करते वेळी  प्रा. बी के पाटील ,ग्रंथपाल के एम कुंभार प्रा. पी ए मोकाशी, प्रा सागर पार्टे




वाचन प्रेरणा दिन प्रसंगी बोलताना प्र प्राचार्य डॉ विश्वास पाटील 

वाचन प्रेरणा दिन प्रसंगी बोलताना प्रा. डॉ एन ए जरंडीकर 


No comments:

Post a Comment