Sunday, 28 February 2021

लायब्ररी

 


Library डॉ. शियाली रामामृत रंगनाथान यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या https://www.dnyansagar.in/2020/08/S-R-Ranganathan.html




ढीगभर पुस्तके 




पुस्तक परिचय 



साहित्ये अकादमी 




साहितीकांच्या पाठीचा कणा लवचिक कसा 




तुषार   विषयी लेख 

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र  मधील करिअरच्या संधी 




23/04/2021




ई -बुक्स वाचनाकडे कल वाचानाकडे कल वाढला 

चला वाचू या ,स्वातलाघडवूया 



सार्वजनिक वाचनालय 

ग्रंथी धरोनी विश्वास 


--------------------------------------------------------------------


मोफत ई रिसोर्स 

http://acsclibrarydharur.blogspot.com/2023/02/online-educational-resources-oers-for.html

 

वाचकांनी इंटरनेटवरील मोफत स्वरूपात उपलब्ध E-resources विषयी माहितीसाठी वरील ब्लॉग पोस्टला भेट द्यावी


----------------------------------------------------------------------------------------------

कृष्णात खोत यांना साहित्ये अकदमी मिळाल्या प्रसंगी 




आदरणीय व वंदनीय सिद्धहस्त लेखक प्राध्यापक कृष्णात खोत सर यांच्या "रिंगाण" या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल सरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा
      "रिंगण" या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचे वास्तव चित्रण सरांनी केले आहे 
      गावठाणकार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या मा.कृष्णात सर यांनी २००८ साली "रिंगाण" ही कादंबरी लिहिली.या कादंबरीचे कन्नड भाषेत भाषांतर झाले असून या कादंबरीवर एम फिल सुद्धा केलं जातं आहे.रिंगाण कादंबरीच्या अल्पावधीतच तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
      रिंगाण " या कादंबरी पूर्वी सरांच्या 'गावठाण',' रौदाळ', 'झड-झिंबाड' , 'धूळमाती' या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
      "रिंगाण " या कादंबरीचा नायक ही कुणी व्यक्ती नसून "खेडेगाव कादंबरीचे नायक आहे".मराठी साहित्यात व्यक्तीला नायक न बनवता गावालाच नायक बनवून सरांनी आगळं वेगळं साहित्याचा मानदंड समाजासमोर आणला आहे.या निमित्ताने ग्रामीण साहित्याला वेगळी दिशा दिली आहे.
       "रिंगाण "ही कांदबरी खेडुतांच्या राजकारणाचा वेध घेणारी मराठी आणि ग्रामीण भागातील अव्वल कादंबरी आहे.ग्रामीण राजकारणावर थेट भाष्य करणारी कादंबरी आहे.
      राजकारण हा अलिकडे गावाचा केंद्रबिंदू झाला असून राजकारणातील अचूक बारकावे सरांनी कादंबरीत टिपले आहेत.आधुनिकतेचे पेचप्रश्न ,विस्थापन ,माणूस आणि निसर्ग -प्राणी यांच्यातील संघर्षाची प्रभावी व वास्तववादी मांडणी सरांनी केली आहे. 
      गावातील लहानमोठ्या प्रसंगाचे ,व्यक्तींचे विशेष कल्पनेने लिहिणारे खूप आहेत,पण प्रत्यक्षात आजूबाजूला घडलेले प्रसंग स्वतः पाहिले असल्याने कादंबरी जिवंत होते.
       "रिंगण" वाचत असताना सरांच्या शब्दांच्या ताकदीमुळे घटना वा प्रसंग समोर घडत असल्याचा जणू भास होतो.
      सर, शब्दप्रभू आहेत. अनेक कादंबऱ्यांचे सिद्धहस्त लेखक असणारे कृष्णात सरांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.
      आचार , विचार व  संस्कार यामुळे सरांच्यात माणुसपण ठासून भरले आहे.सच्चा मित्र,सोबती , समर्थ सहकारी व हाडाचा व संवेदनशील  प्राध्यापक ही सरांची ओळख आहे.
       सरांच्या लेखनासाठी समर्थ साथ देणारी सरांच्या सौभाग्यवती म्हणजे साक्षात गृहलक्ष्मी आहेत.संतुष्ट पत्नी म्हणजे आयुष्यात आलेली ऐश्वर्यलक्ष्मी  असते .सर भाग्यवान आहेत कारण त्यांना अशी साधी,सरळ, शांत, समंजस, समजुतदार अर्धांगिनी लाभली आहे.
      माननीय प्राध्यापक कृष्णात खोत सरांच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा एक स्वल्पविराम ठरु द्या. यांसारखे अनेक अनेक पुरस्कार सरांच्या कादंबरीस मिळाल्यावर मग पूर्णविराम मिळू दे.
      सरांना यापुढेही अनेकविध लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा व भरभरुन शुभाशीर्वाद. ( केवळ वयाने मोठा असल्याने शुभाशीर्वाद)
संपत गायकवाड ( माजी सहायक शिक्षण संचालक)



No comments:

Post a Comment